नगर- कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रा.एस.एम.आय.असीर यांच्या पत्नी मेहरुन्नीसा असीर यांचे निधन आज शनिवार दि. 20 रोजी...

नगर- कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रा.एस.एम.आय.असीर यांच्या पत्नी मेहरुन्नीसा असीर यांचे निधन आज शनिवार दि. 20 रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान झेंडीगेट येथील त्यांच्या निवासस्थानी झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षांचे होते.
श्रीमती मेहरुन्नीसा या स्वभावाने शांत. घरी येणार्या सर्वांचे त्या स्वागत करत. सामान्य स्त्री म्हणूनच त्यांचे जीवन होते. त्यांच्यामागे विवाहित दोन कन्या, जावाई, नातू असा परिवार आहे. कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागीय उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मुन्नाशेठ चमडेवाला त्यांच्या त्या सासू होत्या.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 8 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.









