प्रिंटींग क्षेत्रात काम करताना गुणवत्ता देणे महत्वाचे- मीनाताई मुनोत नगर- प्रिंटींग क्षेत्रात पूर्वीच्या आणि आताच्या काळात खूप बदल ...
प्रिंटींग क्षेत्रात काम करताना गुणवत्ता देणे महत्वाचे- मीनाताई मुनोत
नगर- प्रिंटींग क्षेत्रात पूर्वीच्या आणि आताच्या काळात खूप बदल झालेला आहे. जग कितीही इलेट्रॉनिस क्षेत्रात पुढे गेले तरी प्रिंटींगवरचा लोकांचा विश्वास कदापी कमी होणार नाही. छपाई क्षेत्रात किती कष्ट आहेत, याची मला जाणिव आहे. काम करताना गुणवत्ता देणे महत्वाचे आहे. दर आणि गुणवत्ता याचा ताळमेळ बसला तरच प्रिटींग क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल, असे प्रतिपादन मर्चंटस् बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत यांनी केले.
मुद्रणकलेचे जनक जॉहान्स गुटेन बर्ग यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मुद्रण दिन दि अहमदनगर प्रेस ऍण्ड अलाईड ओनर्स असो.च्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मर्चंटस् बँकेच्या संचालिका श्रीमती मीनाताई मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास प्रा.मोहन देशमुख, नलिनी गंधे, हेमलता पाटील, राज्य उत्तर विभाग सरचिटणीस विनय छाजेड, सेंच्युरियन मार्केटींगचे संचालक गजेंद्र कुलकर्णी, अभय गुंदेचा, असो.चे अध्यक्ष मुकुंद दळवी, संस्थापक मनोज बनकर, उपाध्यक्ष संदिप भगत, रमेश लुणिया, सचिव रामदास औताडे, पोपट शेळके, विक्रम बनकर, मनिष झंवर, ईश्वर भंडारी, गिरीष बच्छा, संजय बाले, संदिप ठुबे आदि उपस्थित होते.









