अहमदनगर - एकत्रितकरणातच समाजाची ताकद असते. प्रत्येक समाजामध्ये पंथीय भेद आहेतच. त्यामुळेच शक्तीचे विघटन होते. म्हणूनच प्रथम पंथीय भेदाचे ...
अहमदनगर - एकत्रितकरणातच समाजाची ताकद असते. प्रत्येक समाजामध्ये पंथीय भेद आहेतच. त्यामुळेच शक्तीचे विघटन होते. म्हणूनच प्रथम पंथीय भेदाचे निराकरण महत्वाचे ठरते. असे मत, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केले.
एलएसएस न्यूज 24 कार्य़ालयास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्यचे अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष संजय भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.कोणतेही संघटन सशक्त होण्यासाठी समाजाचा एकूण पाठिंबा महत्वाचा असतो. तसेच संघटनांनीही समाजात विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. असे सामायिक मत अनिल भोसले व संजय भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.










