नगर - विकास आयुक्त (हातमाग) वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवीदिल्ली यांचे सी.एच.डी.एस. योजने अतंर्गत वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच...
नगर - विकास आयुक्त (हातमाग) वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवीदिल्ली यांचे सी.एच.डी.एस. योजने अतंर्गत वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचे द्वारा प्रायोगित आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपुर द्वारा आय़ोजित जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्रीचे दि.1 फेब्रुवारी पासून शहरातील सावेडी भागातील गायकवाड सांस्कृतिक भवनमध्ये सुरु करण्यात आले आहे.प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. सदरीय प्रदर्शनात राज्यातील विवध जिल्ह्यातील पारितोषिक प्राप्त सहकारी संस्था व
महामंडळानी सहभाग घेतला असून, प्रदर्शनात ठेवण्यात आलेले कापडावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे संस्थांनी तयार केलेल्या कापडाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणे असा शासनाचा उद्देश आहे. सर्व प्रकारच्या कापड खरेदीवर 20 टक्के सूट देण्यात येत आहे. प्रदर्शन केवळ 15 फेब्रुवारी 2016 पर्य़ंतच असल्याने नगरवासीयांनी कापड खरेदी करुन शासनाने सीएचडीएस याजनेअंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि रोजगाराभिमुख प्रदर्शनाचा जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्य़ा. नागपुरद्वारे करण्यात आले आहे.










