अहमदनगर - फिनिक्स फाऊंडेशन व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तरी यापुढेही सर्व युवा मंडळे, ...
अहमदनगर - फिनिक्स फाऊंडेशन व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तरी यापुढेही सर्व युवा मंडळे, सामाजिक संस्था, यांना आवाहन कऱण्यात येते की, त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ती अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले त्यात 63 नागरिकांनी स्वयंफूर्तीने अवयव दानाचा संकल्प करुन फॉर्म भरुन दिले.
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यास अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तरी यापुढेही सर्व युवा मंडळे, सामाजिक संस्था, यांना आवाहन कऱम्यात येते की, त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने अवयवदान जनजागृती अभियानात भाग घेऊन एक राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे. आज देशामध्ये 30 लाख लोकांना अवयव दानाची गरज आहे. अनेकांचे प्राण त्यामुळे वाचणार आहेत. असे प्रतिपादन फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आजपर्यंत 12000 नागरिकांनी या अवयव जनजागृती अभियानात संकल्प केला आहे.
तरी आपणही जनजागृती अभियानात भाग घेऊन एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.










