कोपर्डीची घटना मानवतेला कलंक : हजार-कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या क...
कोपर्डीची घटना मानवतेला कलंक : हजार-कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना खूपच क्लेशदायक असून, मानवतेला कलंक लावणारी ही घटना आहे,अशी खंत •येष्ठ समाज़ेसेवक अण्णा हज़ारे यांनी केली आहे. याबाबत हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना खूपच क्लेशदायक असून, मानवतेला कलंक लावणारी ही घटना आहे. लोणी मावळाची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडावी, याचे अत्यंत दु:ख होते. ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केले त्यांना अत्यंत फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. यामुळे अशा नराधमांना जरब बसू शकेल. त्यासाठी सरकारने प्राधान्याने शक्य ते सर्व प्रय▪करावेत. उज्जवल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून हा खटला चालविण्याची तयारी दाखविल्याचे समजले. ही निश्चितच चांगली बाब आहे. अलिकडील काळात मानवतेच्या नावाखाली काही लोक फाशीच्या शिक्षेला विरोध करतात. परंतु जेव्हा मानवतेला काळिमा फासणार्या घटना घडतात.तेव्हा त्यातील पाशवी प्रवृत्तीला दया दाखविण्यात काहीच अर्थ नाही. हा खटला ज़लदगती न्यायालयात चालवून या दुर्दैवी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा व्हावी. जेणोकरून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही. समाजात महिला आणि मुलींची सुरक्षितता हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. यासाठी सरकार, पोलिस यंत्रणा आणि समाजाने अधिक दक्ष रहायला हवे. जेणोकरून अशा घटना घडणार नाहीत. तसेच अशा घटना घडल्यानंतर त्यावर वादविवाद न करता त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पहायला हवे.व पीडित कुटुंबाला सामाजिक आधार द्यायला हवा, असे हज़ारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
|









