नगर - सावेडी रोडवरील झोपडी कॅन्टीनमागील गुरू सुपर मार्केटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गुरू तांदूळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे....
नगर - सावेडी रोडवरील झोपडी कॅन्टीनमागील गुरू सुपर मार्केटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गुरू तांदूळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. नगरकरांचा आवडता व महिलांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या या तांदूळ महोत्सवात विविध प्रकारचे तांदूळ अत्यंत वाजवी दरात खरेदी करण्याची संधी गुरू सुपर मार्केटच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरू तांदूळ महोत्सवात तांदूळ खरेदी करण्यासाठी विशेषतः महिला ग्राहक वर्ग येथे मोठी गर्दी करू लागला आहे. तांदूळ महोत्सवात तांदळाचे विविध प्रकार ग्राहकांचे आकर्षण ठरत असून, खरेदीवर भरघोस डिस्काऊंट मिळत आहे. चिन्नौर, मोगरा, मदर इंडिया, इंद्रायणी, सेला बासमती, कोलम डायमंड, आंबेमोहर, काली मूँछ, बासमती गुरू रेग्युलर, बासमती गुरू प्रिमियम यांसह इतर विविध प्रकारचा तांदूळ या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आला आहे.









