नगर - येथील दातरंगे मळा एकदंत कॉलनीत श्री गणेश जयंतीला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होवून या जयंती उत्साहात भक्तीमय वातावरणात सांगता झाल...
नगर - येथील दातरंगे मळा एकदंत कॉलनीत श्री गणेश जयंतीला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होवून या जयंती उत्साहात भक्तीमय वातावरणात सांगता झाली. शहर व परिसरातील 3 नव वधु-वर विवाह जोडपी गृहस्थ आश्रमात बध्द झाली. सामुदायिक विवाह सोहळा संकल्पनेतून 3 जोडप्यांनी गणेश जयंतीला वैवाहिक जीवनातील प्रवास सुरु केला. एकदंत गणेश मंडळ दरवर्षी गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक विविध उपक्रम राबवित असल्याने या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळ दरवर्षी गणेश जयंती निमित्त गेल्या 11 वर्षापासून सामाजिक कार्यात वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. विवाह सोहळा साजरा करुन एक आगळा-वेगळा उपक्रम केला. भिमराज कोडम, राजु मंचे, बालाजी गोणे, अमर बुरा, चंद्रकांत बेत्ती, गणेश गुडा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. या सामुदायिक विवाह सोहळ्यास सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहुन वधुवरांना शुभार्शिवादासह सासारीक भेट वस्तू मोठ्या प्रमाणात भेट देऊन नवदांम्पत्यांचा आनंद व्दिगुणित केला.
गुरुवारी गणेश मंदिरात श्री विघ्नेश्वर पुजन व श्री गणपती अथर्व शिर्षन, नाममुर्ती अभिषेक, होमहवन, श्री मुर्ती मिरवणुक व पूर्णाहूती, श्री सत्यनारायण महापूजा, सामुदायिक विवाह सोहळा, श्री महाराप्रसादाने गणेश जयंतीची सांगता झाली.









