अहमदनगर - आपण् ज्या समाजात जन्माला आलो व घडलो त्याविषयीचे ऋण आपल्या कार्य़ातून दर्शविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्या महान व्यक्तीनी स...
अहमदनगर - आपण् ज्या समाजात जन्माला आलो व घडलो त्याविषयीचे ऋण आपल्या कार्य़ातून दर्शविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्या महान व्यक्तीनी समाजाच्या प्रगतीसाठी आपले आय़ुष्य समर्पित केले त्यांच्याविषयीचे कृतज्ञता पुरस्कार व क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून झालेले सामाजिक संगठन ही परिवर्तनाची नांदी असल्याचे उद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. नगर शहर लाड सुवर्णकार समाज व युवक संघटनेच्यावतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 730 च्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे, संघटनेचे अध्यक्ष संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, प्रमोद बुऱ्हाडे, सचिन देवळालीकर,
विनायक नांदुरकर, अनिल बागडे, विजय हिंगणगांवकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून लाड सुवर्णकार समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे गोविंदराव माळवे यांना समाजभूषण व कृष्णकांत गणपत लोणे यांना समाजरत्न पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले.









