अहमदगगर जिल्हा रिक्षा पंचायत तर्फे दि.20 फेब्रु. रोजी मान.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर योग्य कार्य़वाही झाल...
अहमदगगर जिल्हा रिक्षा पंचायत तर्फे दि.20 फेब्रु. रोजी मान.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर योग्य कार्य़वाही झाली नाही अशी रिक्षा पंचायतीची तक्रार आहे. रिक्षा पंचजायतीने पुनश्चः जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मा.जिल्हा अधिकारी साहेब, आम्ही सर्व अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतचे पदाधिकारी व सभासदांनी असा निर्णय घेतला की, येत्या 25/02/2016 रोजी दुपारी 12 वा. अहमदनगर शहरातील सर्व हायवे रोडवर एकाच वेळी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करणार आहोत व जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच राहणार आहे. या आंदोलनाची पुढील दिशा अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष मा.शंकररावजी घुले साहेब हे ठरवतील.
या आंदोलनाचे वेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहिल याची नोंद घ्यावी. पत्रात आंदोलनाचे ठिकाण - पुना रोड, कल्याण रोड, नगर-मनमाड रोड, औरंगाबाद रोड, नगर पाथर्डी रोड, नगर सोलापूर रोड याप्रमाणे दिले आहे.










