श्रीगोंदा - तालुक्यातील आर्वी बेट याठिकाणी भिमा नदीच्या पात्रात पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे सूचना ...
श्रीगोंदा - तालुक्यातील आर्वी बेट याठिकाणी भिमा नदीच्या पात्रात पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.या कारवाईत शासकीय वाळुची चोरी करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जेसीबी, उंपरसह 32 लाख 12 हजार रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपींविरुध्द श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे भदवि कलम 379, 24 सह पर्यावरण कायदा कलम 03/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शशिराज पाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकचे पोसर् संदीप शिंदे, पोना.आण्णा पवार, पोकाँ सुरज वाबळे, रोहित मिसाळ, विनोद माशाळकर, प्रमोद जाधव यांनी केले.









