न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे आयोजीत केलेल्या 5 व्या अभीरुप न्यायालय (मुटकोर्ट कॉम्पीटीशन) स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ...
न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे आयोजीत केलेल्या 5 व्या अभीरुप न्यायालय (मुटकोर्ट कॉम्पीटीशन) स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत असतांना माजी न्यायमूर्ती मा.संभाजीराव म्हसे पाटील यांनी असे विचार मांडले की, समज बांधणीच्या कार्यात वकीलांचा महत्वाचा वाटा असतो. तसेच कोर्टातील प्रलंबीत खटल्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी व वंचीतांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश व वकील यांचे योगदान महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे नवीन कायद्याची निर्मीती होते त्याप्रमाणात न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा विचार शासनाने करण्याची आज गरज आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विश्वासराव आठरे पाटील (विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज) यांनी आपल्या अध्यक्षीय भाणषात असे प्रतिपादन केले की, सध्याचे विद्यार्थी भाग्यवान आहेत आम्ही कायद्याचे शिक्षण घेत असतांना मुटकोर्ट सारखी सुविधा नव्हती. या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देत आहे.










