राम शिंदे : पोलिसांवरील हल्ले प्रकरण पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र काही तांत्रिक अडच...
राम शिंदे : पोलिसांवरील हल्ले प्रकरण
पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ मार्च करण्यात आल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ४ मार्चपर्यंत अंतिम मुदत अहमदनगर : सर्वसमान्यांचे रक्षणकर्ते असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले निंदनीय असून, पोलिसांवरील हल्ले सरकार खपवून घेणार नाही, हल्लेखोरांना धडा शिकवू, अशी भूमिका पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजपत्रित अधिकार्यांच्या कार्यशाळेचे शिंदे यांच्या हस्ते उद््घाटन झाले, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील भूमिका मांडली. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील पानगाव येथे पोलिसावर हल्ला झाला. संरक्षणासाठी पोलीस तैनात असतात.
त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणे निंदनीय आहे. संबंधित पोलीस ठाण्याला भेट देवून प्रमुख धिकार्यांची बैठक घेतली. बैठकीत याविषयीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापुढे असे हल्ले होणार नाहीत, याची काळजी पोलीस तर घेतलीच. पण पोलिसांवरील हल्ले करणार्यांची सरकार गय करणार नाही. च्याविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे शिंदे म्हणाले.










