नगर - विश्व हिंदू परिषदेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे व जिल्हा मंत...
नगर - विश्व हिंदू परिषदेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे व जिल्हा मंत्री माणिकराव देशपांडे तसेच जिल्हाध्यक्ष उत्तमराव कदम, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई चंदे, शहराध्यक्ष धनःश्याम पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये आगामी काळातील कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. दुष्काळ निवारण करण्याकरिता नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच विविध पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
तालुकास्तर, जिल्हास्तर, शहर स्तरावरील कार्यकर्त्यांना दायित्व देण्यात आले. प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तमराव चेमटे, शहर उपाध्यक्षपदी अॅड.जय भोसले, जिल्हा कोषाध्यक्षपदी गणेश गवळी, नाशिक विभागाच्या सेवा विभागपदी महादेव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. पसायदानाने बैठकीची सांगता कऱण्यात आली.










