मराठी भाषेच्या वापरासाठी आपण अग्रही राहिलो पाहिजे-प्रा.मेधा काळे नगर- मराठी भाषेवर आजपर्यंत अनेक अक्रमण झाले. मात्र छत्रपती शिवा...
मराठी भाषेच्या वापरासाठी आपण अग्रही राहिलो पाहिजे-प्रा.मेधा काळे
नगर- मराठी भाषेवर आजपर्यंत अनेक अक्रमण झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे व मराठी संत मंडळींनी ही आक्रमणे थोपविले. मात्र त्यानंतर इंग्रजांनी इंग्रजीभाषने मराठीवर केलेले आक्रमण थोपवता आलेले नाही. त्यामुळे मराठी भाषेचे महत्व कमी होऊन इंग्रजीचे महत्व वाढले आहे. इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण हेही मराठीचे महत्व कमी होण्यास महत्वाचे कारण आहे. या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. इंग्रजी भाषेबरोबरच आपल्या मराठी भाषेच्या वापरासाठी आपण अग्रही राहिलो पाहिजे; तरच आपल्या वैभवशाली मराठीची जपवणुक होईल.
सारडा महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्र मराठी भाषेचा जपवणुकीसाठी चांगले प्रयत्न करत आहेत. गुणवान व अभ्यासू प्राध्यापक विद्यार्थ्यांना लाभले आहेत. मराठी संशोधन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व अधिक समृद्ध होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्रा.मेधा काळे यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कार्यक्रमात प्रा.काळे प्रमुख पाहुण्याम्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.अमरजा रेखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक प्रा.डॉ.माहेश्वरी गावीत, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.प्रतिक्षा गायकवाड, प्रा.डॉ.संगीता शेळके, प्रा.डॉ.मच्छिंद्र वाळूंजकर, प्रा.डॉ.संगीता शेळके, प्रा.डॉ.प्रकाश जाधव आदींसह मराठी संशोधन केंद्राचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मराठी संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सुरेश भट, फ.मु.शिंदे, मंगेश पाडगांवकर, आनंद यादव आदि महान कवींच्या गाजलेल्या कविता या कार्यक्रमात सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धैर्यशिला कळमकर व संतोष भागवत यांनी केले तर आभार मनिषा शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.









