श्रीगोंदा तालुक्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे व शेतकर्यांच्या हातात असलेले पीक दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांनी पाण्या आभावी ...
श्रीगोंदा तालुक्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे व शेतकर्यांच्या हातात असलेले पीक दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांनी पाण्या आभावी बऱ्याच ठिकाणी पीके सोडून दिलेली आहेत. फळबागा व इतर पीके यांना जर पाणी सोडले गेले तरच ही पिके वाचू शकतात. लवकरात लवकर कुकडी व घोडचे आवर्तन सोडण्यात यावे य संदर्भात युवक चे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले सर्व शेतकरी बांधव यांनी मा. तहसीलदार यांना निवेदन दिले .
श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेली दोन ते तीन वर्षीपासून दुष्काळ परिस्थिती मुळे शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती खूपच अडचणीत आलेली आहे. याच शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे हाल हे व्यापारी सरकार कसे गप्पा बसून शेतकर्यांचे हाल पाहत आहे तरी पण फक्त घोशानांचाच पूस कृती मध्ये काहीच नाही. त्याच प्रमाणे या दुष्काळी परिस्थिती मध्ये शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीत आला आहे व याचा परिणाम विध्यार्थ्यावर सुद्धा होत आहे. अशावेळेस शेतकऱ्यांना मदत व विद्यार्थ्यांना धीर द्यायचे सोडून सरकार गप्प बसायचे धोरण घेतल्यामुळे विध्यार्थ्याचे शैक्षणिक जीवन विस्कळीत होत आहे व पैशा अभावी शेतकरी व कष्टकरी मजूर आपल्या मुलांना घरी ठेवत आहे त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी शासनाने विद्यार्थ्याचे एस.टी. पास फ्री, शैक्षणिक परीक्षा फी,शैक्षणिक शुल्क त्वरित माफ करा व शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित मिळावी व त्याच प्रमाणे घोड व कुकडीचे आवर्तन त्वरीत सोडावे अन्यथा दिनांक ०८/०३/२०१६ रोजी सकाळी १० वाजता तहसील बंद आंदोलन करण्यात येईल असे युवक चे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे
यावेळी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोहारे ,डॉ गोरख बयकर ,सुभान तांबोळी ,सचिन गायकवाड ,फिरोज जकाते ,मुज्जफर मालजप्ते ,प्रवीण ढगे, बापू नवले, संदीप वागस्कर,वामन भादे , भाऊसाहेब डांगे, संतोष रोडे , भिवशेन जाधव , प्रसाद काटे , असलम शेख , दादासाहेब साबळे , विशाल बायकर नितीन उबाळे आदींसह युवक काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.










