नगर- अ.नगर डिस्ट्रिट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने व धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्र मंडळ, अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने शिव...
नगर- अ.नगर डिस्ट्रिट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने व धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्र मंडळ, अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत दरेवाडीचा प्रदीप पोपळघट 150 स्पर्धकांवर मात करीत ‘अकोले श्री 2016’ चा मानकरी ठरला. त्यास मान्यवरांच्या हस्ते रोख 5 हजार रुपये, मानाचा चषक व बेल्ट प्रदान करण्यात आला. बेस्ट पोझर चा मानकरी दरेवाडीचाच अक्षय मोरे व बेस्ट इंम्प्रुव्हमेंटचा मानकरी अ.नगरचा इम्रान शेख ठरला. ज्युनियर मास्टर श्री स्पर्धेत नगरचा उस्मान शेख व सिनीअर मास्टर श्री स्पर्धेत अ.नगरचाच शहा मन्सूर सुभेदार ठरला. त्यांना आकर्षक ट्रॉफी मानपत्र व मानाचा बेल्ट मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड, राष्ट्रीय पंच प्राचार्य जयंत गिते, मनोज गायकवाड, सतीश रासकर, मयुर दरंदले, कैलास रणसिंग, अशोक कावरे, अशोक बेरड, कन्हैय्या गिलेशर यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे अध्यक्ष महेशदादा सातपुते, कार्याध्यक्ष अविनाश मोरे आदिंसह पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.
विविध वजनी गटातील यशस्वी अनुक्रमे खेळाडू - 55 किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक- आकाश भोसले (राहुरी), द्वितीय क्रमांक- शोएब सय्यद (नेवासा),तृतीय क्रमांक- नवनाथ कुर्हे (राहुरी), चतुर्थ क्रमांक- रिक्षवान शेख (नगर), पाचवा क्रमांक - पंकज अडागळे (नगर). 60 किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक- बिलाल तांबोळी (कोपरगाव), द्वितीय क्रमांक- शेख सद्दाम हुसेन (नगर),तृतीय क्रमांक- शेख तरबेज (नगर), चतुर्थ क्रमांक- मोईन तांबोळी (नगर), पाचवा क्रमांक - शेख गुलाम (नगर). 65 किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक-मयुर कदम (कोपरगाव),
द्वितीय क्रमांक- सद्दाम शेख (नगर),तृतीय क्रमांक- सय्यद आर्सिें (नगर), चतुर्थ क्रमांक-सगार घोगरे (राहता), पाचवा क्रमांक -रवि गायकवाड (राहता). 70 किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक- प्रदीप पोपळघट (नगर), द्वितीय क्रमांक-स्वप्नील पानसांडे (श्रीरामपूर), तृतीय क्रमांक- सनी मनियार (अकोला), चतुर्थ क्रमांक- शेख अन्सार (राहता), पाचवा क्रमांक -जाधव तुषार (राहता). 75 किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक-अक्षय मोरे (नगर), द्वितीय क्रमांक- विशाल दळवी (नगर),
तृतीय क्रमांक- रोहन निंबाळकर (नगर), चतुर्थ क्रमांक-किरण पाटकुले (नगर), पाचवा क्रमांक - अजय बेंद्रे
(राहता).75 + किलो वजनी गटात :- प्रथम क्रमांक- शेख इम्रान (नगर), द्वितीय क्रमांक- मुस्ताक पटेल (अकोले),तृतीय क्रमांक- सय्यद साजीद (नगर), चतुर्थ क्रमांक- ट्रॉफी जाहीर (अकोले) सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कार्यक्रमास मोठे क्रीडाप्रेमी उपस्थित होते.










