नगर- अलंकार हा जसा स्त्रीचा दागिना आहे. तसे स्त्रीयांचे कुंकू हा सौभाग्याचे लेन आहे. कुठल्याही कार्यक्रमात स्त्रीया एकमेकींना हळद कुंकूव...
नगर- अलंकार हा जसा स्त्रीचा दागिना आहे. तसे स्त्रीयांचे कुंकू हा सौभाग्याचे लेन आहे. कुठल्याही कार्यक्रमात स्त्रीया एकमेकींना हळद कुंकूवाचे दान देत सौभाग्य वाढविण्यासाठी प्रार्थना करतात. संक्रांत सणात हळदी-कुंकवामुळे स्त्रीयांचे सौभाग्य वाढते असे प्रतिपादन नगरसेविका रुपाली वारे यांनी केले.
साई-संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने साई मंदिरात सामुदायिक हळदी-कुंकू पारपडला यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या स्त्रीयांमधील कटूता असा समारंभामुळे दूर होते. या साई मंदिरास सुजय विखे, मा.नगरसेवक निखिल वारे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी या प्रभागातील सुमारे 200 स्त्रीयांनी हळदी-कुंकूवामध्ये सहभाग नोंदवून वाण म्हणून ज्ञानवाढीसाठी अध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल त्रिंबके, दिपक कुडीया, योगेश पिंपळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन - संदेश नगर येथील साई मंदिरात सामुदायिक हळदी-कुंकू समारंभात नगरसेविका रुपाली वारे, कांता बोठे व महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी साईबाबांची आरती करतांना नगरसेवक गणेश कवडे व भाविक.










