रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे विविध संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना कोतवालीचे पो.नि.अविनाश मोरे, समवेत विज...
रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे विविध संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना कोतवालीचे पो.नि.अविनाश मोरे, समवेत विजय सावंत, गणेश गावडे, अॅड. रविंद्र शितोळे, दिलीप जाधव, गोविंद आडम, रमेश हिवाळे, दिग्वीजय गावडे, सावना छाबडा, सागर नाईकवाडी, विपुल वाखुरे, विक्रम वाडेकर, शिवाजी नाईकवाडी आदि. (छाया : यतीन कांबळे)
नगर - रक्तदान, नेत्रदान, अवयव दान याबाबत समाजाध्ये अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे पेशंटला पाहिजे त्या प्रमाणात रक्त-अवयव उपलब्ध नाहीत. त्यामुळे युवकांनी यामध्ये सक्रीय सहभागी सहोवून याबाबत जागृती करुन पुढाकार घेतला पाहिजे. आपण दिलेल्या या दानामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवून या कार्यात सहभागी झाल्यास, ही एक जनचळवळ म्हणून पुढे येऊ शकते. असे प्रतिपादन तोफखाना पोलिस ठाण्याचे पो.नि.अविनाश मोरे यांनी केले.
रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या बरोबर राष्ट्र सेवा दल, योग विद्या फौंडेशन, क्रांतीवीर प्रतिष्ठान, ओन्ली एन्जाय ग्रुप, हॅपी ग्रुप सारडा कॉलेज, विनायक राजे प्रतिष्ठान, कॉन्व्हेंट ग्रुप, निमा फाऊंडेशन, स्वतेज ग्रुप या संघटनांच्या सहभागातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अविनाश मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.









