फंडू टॉईज डॉट कॉम आणि अहमदनगर जिल्हा वाचनालय यांच्यावतीने शालेय मुलांसाठी नैज्ञानिक उपकरण कार्यशाळा आयोजित झाली होती. याप्रसंगी उपकरण ब...
फंडू टॉईज डॉट कॉम आणि अहमदनगर जिल्हा वाचनालय यांच्यावतीने शालेय मुलांसाठी नैज्ञानिक उपकरण कार्यशाळा आयोजित झाली होती. याप्रसंगी उपकरण बनविण्यात दंग झालेले मुले (छाया - सुरेश मैड)
नगर - मुलांच्या हातात विविध वैज्ञानिक उपकरणे, हवेचा सिध्दांत समजून सांगणारी बलूनकार विविध भौमितिक आकार, का़ड्यांपासून बनविण्यात येणारे विविध प्रकार आणि आपल्या पाल्याने स्वतःच्या हाताने तयार केलेली उपकरणे पाहण्यासाठी जमलेले उत्सुक पालक. ही सर्व मौज-मजा होती. जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात फंडू टॉईज डॉट कॉम आणि अहमदनगर जिल्हा वाचनालय यांच्यावतीने शालेय मुलांसाठी वैज्ञानिक उपलब्ध उपकरण कार्य़शाळा आयोजिण्यात आली होती.प्रत्येक मुलाच्या हातात एकेक उपकरण देण्यात आले. त्यातून मुलांना त्यांच्या पातळीवर जावून तुम्ही याचे तुम्हांला हवे ते तयार करा असा मुलांशी संवाद साधला. फंडू टॉईजचे संचालक अभिजित भळगट, सनी वधवा, पुष्कर जंगले, गगन वधवा यांनी मुलांना विज्ञानाचे धडे दिले.
या कार्य़शाळेत एकूण 150 मुले सहभागी झाली होती. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालक शिल्पा रसाळ-जोशी, किरण अग्रवाल, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, ग्रंथपाल संजय लिहिमे, सहाय्यक ग्रंथापास अमोल इशापे उपस्थित होते.










