अहमदनगर - गेल्या 6 दिवसापासून नगर शहरासह राज्यातील बिडी कारखाने बंद आहेत. बिडी बंडलवर 85% धोका चित्र छापण रद्द करा अशी कामगारांची मागणी हो...

अहमदनगर - गेल्या 6 दिवसापासून नगर शहरासह राज्यातील बिडी कारखाने बंद आहेत. बिडी बंडलवर 85% धोका चित्र छापण रद्द करा अशी कामगारांची मागणी होती. मात्र या मागणीचा अद्याप उपयोग न झाल्यामुळे हजारो बिडी कामगारांनी गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्य़ालयावर मोर्चा नेला. महिलांनी राम शिंदे कार्य़ालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जवळपास 3 तासापासून हे आंदोलन चालू होते. बातमी प्रसिध्द करेपर्यंत पुढील कार्य़वाही समजली नाही.









