अहमदनगर - जिल्ह्यातील मुद्रण व्यावसायिकांच्या सुलभतेसाठी बुधवार दि. 24 फेब्रुवारी रोजी, सेंच्युरियन मार्केटिंगतर्फे कॅनन आणि रीस...
अहमदनगर - जिल्ह्यातील मुद्रण व्यावसायिकांच्या सुलभतेसाठी बुधवार दि. 24 फेब्रुवारी रोजी, सेंच्युरियन मार्केटिंगतर्फे कॅनन आणि रीसो कंपनीच्या डिजिटल प्रिंटींग मशिनरींचे प्रात्यक्षिक (डेमो) आयोजित करण्यात आले आहे.
दि अहमदनगर प्रेस अॅण्ड अलाईड ओनर्स असोसिएशन या संघटनेमार्फत गेल्या 4-5 वर्षांपासून अशा प्रकारे प्रिंटींग मशिनरींचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यंदा हे प्रात्यक्षिक अहमदनगर येथे कोर्ट गल्लीतील सुयोग मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मिनाताई मुनोत असणार आहेत. सकाळचे निवासी संपादक बाळ बोठे, मुद्रण व्यावसायिक डॉ.मोहन देशमुख सर, सौ.नलिनी गंधे, सौ.हेमलता पाटील उपस्थित राहणार आहेत.
24 मे हा जागतिक मुद्रण दिन आहे. मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग यांचे स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. अधिकाधिक मुद्रण व्यवसायिकांनो या प्रात्यक्षिकाचा साथ घ्यावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.










