अहमदनगर - नगर शहरातील विनापरवाना रिक्षांवर कारवाईसाठी मागील काही महिन्यांपासून परवानाधारक रिक्षा चालक मालक संघटनेने सातत्याने पाठपुरावा ...
अहमदनगर - नगर शहरातील विनापरवाना रिक्षांवर कारवाईसाठी मागील काही महिन्यांपासून परवानाधारक रिक्षा चालक मालक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने शहरातील विनापरवाना रिक्षांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. या कारवाईबद्दल परवानाधारक रिक्षा चालकांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गिेते यांचा सत्कार करण्यात आला. आरटीओने कारवाईत सातत्य ठेवून परवानाधारक रिक्षाचालकांचे अन्य प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोडे, उप.प्रा.प.अधिकारी तडवीसाहेब आदि अधिकारी उपस्थित होते.










