नगर-भिंगार येथील सुहासराव काशिनाथ सोनवणे यांना नुकताच शांतीदूत कला अभियान, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाज शिरोमणी पुरस्...
नगर-भिंगार येथील सुहासराव काशिनाथ सोनवणे यांना नुकताच शांतीदूत कला अभियान, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाज शिरोमणी पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री प्रेमा किरण यांचा शुभहस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय, सुरेंद्र गावसकर सभागृह (दादर) येथे संपन्न जाला. सुहास सोनवणे हे नगर तालुक्यातील कौडगांव येथे ए.डी.सी.सी.बँकेत मॅनेजर म्हणून कार्य़रत आहेत. आजपर्यंत अहमदनगर, मुंबई, नांदेड याठिकाणी त्यांनी सामाजिक दृष्ट्या चांगले काम केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे भिंगार मधील सर्व समाजाच्या लोकांकडून व जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचारी तसेच नगर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी अभिनंदन केले.










