नगर - केडगाव येथील महादजी शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वारसांना विम्याचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. पतसंस्थेचे कर्जदार ग...
नगर - केडगाव येथील महादजी शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वारसांना विम्याचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. पतसंस्थेचे कर्जदार गणेश आसाराम सोनवणे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना विम्याच्या रकमेपोटी 2 लाख रुपये (रुपये दोन लाख) चा धनादेश प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण येणारे व उपाध्यक्ष अविनाश म्हस्के यांच्या हस्ते कै.गणेश सोनवणे यांच्या वारस पत्नी मंदा सोनवणे यांना हा धनातेश देण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे संचालक गणेश येणारे, प्रकाश श्रीमंदिलकर, सौ.ज्योती येणारे, व्यवस्थापिका सौ.पावसे, क्लार्क कुलथे, श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे ब्रॅंच मॅनेजर विलास शिंदे, संदीप गायकवाड, मोहिनी आकुल, सुधीर नागे, मनोड अडवाणी, डॉ.लोंढे, रुपचंद चोरडिया, गणेश कोतकर, आसाराम सोनवणे आदि उपस्थित होते.










