Archive Pages Design$type=blogging

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन योजनेची बैठक

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 च्या खर्चाचा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला.यावेळी...

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 च्या खर्चाचा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला.यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषाताई गुंड, खासदार दिलीप गांधी, महापौर अभिषेक कळमकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, आमदार सर्वश्री विजय औटी, शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप, बाळासाहेब मुरकूटे, वैभव पिचड, राहुल जगताप, भाऊसाहेब कांबळे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, सहायक नियोजन अधिकारी एस.बी. व्हरसाळे, उमेश सूर्यवंशी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त माधव वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2015 16 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या 100 टक्के निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीच्या 68.73 टक्के निधी कार्यवाही यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र हिस्सा पुर्णतः प्राप्त झालेला नसल्याने त्यासाठीचे निधी वितरण प्रलंबित आहे. दि.31.01.2016अखेर वितरीत निधीच्या 82.14 टक्के निधी खर्च झालेला आहे. सन 2015-16 साठीची संपूर्ण तरतूद विहित कालावधीत खर्च होणे अपेक्षित आहे. 
जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 पुनर्विनियोजन प्रस्ताव 
जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 साठी मंजूर नियतव्ययाच्या अनुषंगाने सर्व कार्यान्वयीन यंत्रणांकडून माहे मार्च, 2016 अखेर अपेक्षीत खर्चाचा आढावा घेण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे काही योजनांवरील तरतूद पूर्णतः खर्च होणे शक्य नसल्याने यंत्रणांनी बचत कळविलेली आहे तर काही योजनांवर जादा खर्च होणे अपेक्षित असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी नोंदविलेली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी सन 2015-16 साठी अहमदनगर जिल्ह्यास रुपये 30.30 कोटी तरतुद जादा मंजूर झाली असून ही तरतूद जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील मृदसंधारणाच्या उपाययोजनेद्वारे जमिनीचा विकास या योजनेच्या लेखाशिर्षावर अर्थसंकल्पीत झालेली आहे. शासनाने जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यास मृदसंधारणाच्या उपाययोजनेद्वारे जमिनीचा विकास कार्यक्रमासाठी रुपये 30.30 कोटी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करुन दिलेली आहे.कार्यान्वयीन यंत्रणांकडील बचत विचारात पुनर्विनियोजनाद्वारे खालील योजनांसाठी वाढीव उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन योजनेची बैठक
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन योजनेची बैठक
http://103.23.150.134/Uploads/TNAIMAGE15808Nagar.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago