नगर - शहरातील सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना व मालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे (आरटीओ) आवाहन करण्यात येते की त्या...

नगर - शहरातील सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना व मालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे (आरटीओ) आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या वाहनाचे संपुर्ण विधीग्राह्य कागदपत्र (कर, विमा, परवाना, बॅज, पासिंग, लायसन) सोबत बाळगावे.
तसेच वाहन चालकाने युनिफॉर्म घातलेला असावा, बॅज लावलेला असावा त्याचबरोबर प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे. कोणत्याही प्रवाशांकडून जादा भाडे घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे प्रवाशांशी वागणूक चांगली ठेवावी, प्रवाशांच्या तक्रारी येता कामा नये.आपल्या रिक्षाला मागील बाजूस लोखंडी जाळी बसवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) श्री.राजाभाऊ गिते यांनी केले आहे.









