नगर - भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद चांगले काम करीत असून, त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. प्रभागात ...
नगर - भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद चांगले काम करीत असून, त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. प्रभागात विकासकामे सुरु झाली आहेत. कॅन्टोन्मेंट सदस्य झाल्यापासून विकासाच्या माध्मयातून प्रभागातीलसमस्या दूर केल्या आहेत. भिंगारमधील विविध प्रभागांत आता खऱ्या अर्थाने विकासकामे सुरु झाली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर भिंगारला नवे रुप प्राप्त होईल. आमदार निधीच्या माध्यमातून भिंगारमध्ये विकासकामे करणार आहोत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
भिंगार कॅन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद यांच्या विकासनिधीतून सदर बाजार येथीलपोलीस स्टेशन ते इराणी रोडपर्यंत डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होत. याप्रसंगी राणाशेठ परमार, संभाजी भिंगारदिवे, मीर मुश्ताक, सलीम कान, सलीम वायरमन, संजय सपरकाळ, ख्वाजा पहिलवान, जिमी नगरवाला, पप्पू वॉचमेकर, अजिंक्य भिंगारदिवे, सय्य्द सादिक, रमेश परदेशी, शाहनवाज सय्यद, सौरभ धामणगावकर, मयूर भोसले, कल्पना जाधव, शंकुतला पानपाटील, प्रज्योत सिंग, निर्मलसिंग गरेवाल, जोगासिंग मिनहास, मय.ूर भोसले, अभियंता सोनवणे, अशोक फुलसौंदर आदी उपस्थित होते.










