संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (विदर्भ) यांचा प्रगट दिन दि.1 मार्च 2016 रोजी धरमपुरी (निंबळक) येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे...
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (विदर्भ) यांचा प्रगट दिन दि.1 मार्च 2016 रोजी धरमपुरी (निंबळक) येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. प्रति शेगांव अशी ख्याती लाभलेली धरमपुरी गेली 17 वर्षे प्रगटदिन सोहळा साजरा करत आहे. भारतवर्ष ही संतांची, सद्विचारांची खाण असून, महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम याप्रमाणे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज होत. संतकवी दासगणु महाराज यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाची निर्मिती केली आहे. शिर्डीचे संत साईबाबा हे गजानन महाराजांचे समकालिन संत होत. संतांची महती वर्णन करताना जर्नादन महाराजांनी केलेले कवन योग्यच आहे.
1 मार्च 2016 रोजी श्री क्षेत्र धरमपुरी येथे होणार्या मोठ्या सोहळ्यास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. या दिवशी सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यात प्रामुख्याने अन्नदान, स्नेहालय संस्थेच्या अनाथ मुलींचे विवाह, अंध-अपंग, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे इत्यादी कार्यक्रम दरवर्षी साजरे केले जातात. श्री क्षेत्र धरमपुरी येथे कोणतीही पावती केली जात नाही. स्वइच्छेने भाविक अन्नदान करतात. रोजी साधारणत: 400 ते 500 भक्त महाप्रसाद घेतात व वर्षभराचे भोजन पंगत दिनदर्शिका पूर्ण असते.










