नगर- सामाजिक समतेसाठी अविरत संघर्ष करणारे कॉ.गोविंदभाई पानसरे यांचा प्रथम स्मृतीदिन शनिवार दि.20/2/2016 रोजी सांस्कृतिक दहशतवाद विरोधी ...
नगर- सामाजिक समतेसाठी अविरत संघर्ष करणारे कॉ.गोविंदभाई पानसरे यांचा प्रथम स्मृतीदिन
शनिवार दि.20/2/2016 रोजी सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून आयोजित करण्यात येत
असून त्यानिमित्त सांस्कृतिक दहशतवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यघटना या विषयावर
बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रेमानंद रुपवते, प्रा.स्मिता पानसरे यांचे व्याख्यान
आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य संयोजक अॅड.सुभाष लोंढे यांनी केले.
रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे शनिवारी दु.1 वा.मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त रामनाथ
वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अभिषेक कळमकर,
हमाल पंचायतचे शंकरराव घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुनील
गोसावी संपादित प्रेरणा सूर्य या लेख संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कॉ.संतोष खोडदे, अॅड.सुधीर टोकेकर, अहमदनगर जिल्हा कष्टकरी कामगार संघटना फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडन्स फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन्, आयटक कामगार संघटनेच्या वतीने कऱण्यात आले आहे.









