नगर - इसळक-निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरी परमसत्य येथे श्री संत गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आ...

नगर - इसळक-निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरी परमसत्य येथे श्री संत गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवार दि.27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान श्रींच्या ग्रंथाचे सामुहिक पारायण स. 8.30 ते 1.30 पर्यंत होणार आहे. तसेच मंगळवार दि.1 मार्च 2016 रोजी हरिकिर्तन, प्रवचन, दिंडी प्रदक्षिणा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, भजन संध्या आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या सर्व भाविकांनी, संत सज्जनांनी, किर्तन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.









