नगर - प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी संधी मिळते. मात्र काही शाळांमध्...
नगर - प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी संधी मिळते. मात्र काही शाळांमध्ये चांगले विद्यार्थी असतांना देखील त्यांना तशी संधी मिळत नाही. मात्र बुऱ्हाणनगरला अनाथाश्रमाच्या मुला-मुलींना अंबिका महोत्सवातून आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी खरंच सोन केलं, तसेच या सर्व अनाथ मुला-मुलींना क्षितिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगपात यांनी केले.
अनाथ, निराधार, उपेक्षित मुलांसाठी एखादा 'अच्छे दिन' असावा हे ध्येय समोर ठेवून नागर तालुक्यातील 11 अनाथाश्रम शाळांना एकत्र आणून त्यांचे स्नेहसंमेलन, स्नेहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी क्षितिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर भगत यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. अनाथांसाठी काही तरी करण्याचा मानस असल्याने 11 शाळांना एकत्रीत आणून त्या शाळेच्या मुला-मुलींना आपल्या कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला असल्याचे सांगितले. या महोत्सवास जि.प.सदस्य बाजीराव गवारे, पै.संदीप कर्डिले, राजाभाऊ कोठारी, पै.देविदास कर्डीले, उद्योजक लॉरेन स्वामी, दगडू पानसरे, बाळासाहेब कर्डीले, बापू आव्हाड, राम पानमळकर, साहेबराव चेमटे, रोहित चंगेडिया, किर्ती चंगेडिया आदी उपस्थित होते.
यावेळी बाजीराव गवारे, संदिप कर्डीले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत शिंदे यांनी केले तर महेश भगत यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत औटी, महेश वाडेकर, कृष्णा शहाणे, विवेक नांगरे, प्रविण भगत, रवि दरोडे, राहूल गिरे, महेश मुळे, नितिन भगत, सागर औटी, निलेश पवळे, राहूल चेमटे, दिपक भगत, नंदू धाडगे, संतोष गाढवे तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.










