नगर - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक सामाजिक कार्य करण्यास ...
नगर - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक सामाजिक कार्य करण्यास नेहमीच तत्पर असतो. 'जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रिद वाक्य समजून अंगणाडीमधील लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करुन त्यांनी दिलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केले.
रेल्वे स्टेशन शिवसेना विभागप्रमुख प्रशांत वाघमारे यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा पवार, मुख्यसेविका श्रीमती कांबळे, लता सोनवणे, सुरेखा सरोदे, कुणाल खैर, गणेश झिंजे, सनी निर्मल, रवी तांबे, प्रणव कांबळे, मिकी जगताप, अक्षय ससाणे, सागर साळवे, वाहित पठाण, अजय कोतकर, दिपक भालेराव, महेश साळवे, रवि बारगुल, आकाश रणदिवे, अक्षय मेढे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना कदम म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार देऊन सुसंस्कारीत करावीत, आजची ही मुलं उद्याची भावीपिढी आहे. त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य देणे हे सरकार बरोबरच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. याच भावनेतून हा उपक्रम विभागप्रमुख प्रशांत वाघमारे यांनी हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी बोलतांना प्रशांत वाघमारे म्हणाले की, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सहकार्याने आम्ही नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपासारखे उपक्रम राबवितो. यापुढेही असेच उपक्रम शिवसेना व प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येतील, असे सांगितले.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सागर कदम, निखिल मेढे, विपुल ठोंबरे, प्रज्ञाशिल पाटेकर, राहुल कदम, मनोज पंचमुख, विशाल पगारे, हर्षद नन्नवरे, तुषार शिंदे, बाळू पंचमुख आदिंसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनी निर्मल यांनी केले तर आभार रवी तांबे यांनी मानले.










