नगर - नगर तालुयातील डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांनी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात मुलांन...
नगर - नगर तालुयातील डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांनी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात मुलांनी सादर केलेली मराठमोळी गाणी व देशभक्तीवर गीतांनी प्रत्येकास ठेका धरायला लावला. टाळ्यांच्या गजरात मान्यवर, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत मुलांचा उत्साह अधिक द्विगुणित केला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नगर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ व पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने संपन्न झाले. यावेळी सरपंच कैलास पटारे, मुख्याध्यापिका श्रीमती भावसार, श्रीमती ढोकणे, सौ. सुमित्रा छजलाने, मते सर, गोसावी, वाळके सर आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.










