नगर- समाजात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद मधील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी आता मागे राहिले नाहीत. कर्जत तालुक्यातील मल...
नगर- समाजात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद मधील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी आता मागे राहिले नाहीत. कर्जत तालुक्यातील मलठण सारख्या छोट्या गावात जि.प.प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी विविध परिक्षांमध्ये चमकत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे दिल्याने त्यांना अधिक प्रेरणा मिळते व त्यांचे मोठे ध्येय साध्य होते असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँक स्टाफ सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव दळवी यांचे केले.
मालठण जि.प.प्राथमिक शाळेतील विविध परिक्षांमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या मुलामुलींना रोख रकमेसह बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी दळवी बोलत होते. ते पुढे म्हणाले आई-वडिलांचे स्वप्न होते. सदैव गोर-गरिबांना मदत करुन त्यांच्या सुखदुःखात समरस झाले कि वेगळा आनंद मिळतो. हे लक्षात ठेवून त्यांच्या स्मृतीदिन आज बक्षिसे देण्याचे आल्याचे दळवी यांनी सांगितले.
यावेळी वसंत दळवी यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब भिसे, मलठणचे सरपंच सौ.विजया भिसे, उपसरपंच संभाजी जाणकर, ग्रामसेवक केसकर, डॉ.सुरेश भिसे, डॉ.मुबारक शेख, स्मिता दळवी, अलका दळवी, नारायण वाघमारे, किरण दळवी, पोलिस पाटील विजय भिसे, मुख्याध्यापक भालचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.










