नगर - आजची पिढी महत्वाकांक्षी असल्याने चिकित्सक वृत्ती वाढलेली आहे. अॅडजेस्टमेंटची तयारी नसल्याने पालकांच्या मताला दुय्यम स्थान प्...
नगर - आजची पिढी महत्वाकांक्षी असल्याने चिकित्सक वृत्ती वाढलेली आहे. अॅडजेस्टमेंटची तयारी नसल्याने पालकांच्या मताला दुय्यम स्थान प्राप्त झालेले आहे. परंपरागत मान्य असलेले व कायद्यानेही मान्य असलेले लग्नाचे वय आज तरुण पिढी करियरच्या नादातच वयाची तिशी गाठतात. परिणामी त्यांच्यापुढील पिढीचे करिअर बिघडून अन्याय करत आहोत, याचे भान आज नवीन पिढीला नाही. करियरच्या नादात मुला-मुली्ंची वयोमर्य़ादा वाढत चाललेली असल्याने संसाराचे करियर बिघडते, अशी खंत होणार सून मी या घरची या मालिकेतील अनिल आपटे यांची भुमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते सतीष सलागरे यांनी व्यक्त केली.
नगरमधील अक्षता गार्डन येथे शिंपी समाजातील वधू-वर मेळावा संपन्न झाला. या राज्यस्तरीय मेळाव्यात नगर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, जळगांव, नाशिक अशा विविध ठिकाणाहून पालकांसह वधू-वर उपस्थित होते.
मेळाव्याचे हे चौथे वर्ष होते. जवळ-जवळ अडीच ते तीन हजार जणांची उपस्थिती या मेळाव्यास होती. या मेळाव्यात दिशादर्शक कार्य कऱणाऱ्या श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमनबाई नेवासकर यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.











