अहमदनगर - गणेश मारुती भूतकर (वय 31) रा.डोंगरगण शिवार, ता.जि.अहमदनगर याने पत्नीला मुलगा होत नाही या कारणास्तव, पत्नी अनिता गणेश भूतकर (वय 2...

अहमदनगर - गणेश मारुती भूतकर (वय 31) रा.डोंगरगण शिवार, ता.जि.अहमदनगर याने पत्नीला मुलगा होत नाही या कारणास्तव, पत्नी अनिता गणेश भूतकर (वय 26), मुलगी ज्ञानेश्वरी (वय 5), संजीवनी (वय 3) यांचा रात्री झोपेत गळा दाबून खून केल्याप्रकऱणी मा.जिल्हा न्यायाधीश क्र.2 श्रीमती आर.व्ही.सावंत वाघुले मॅडम यांनी आरोपीस दोषी धरुन भा.द.वि. 302 नुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा व रुपये 10,000/- दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच कलम 498 अन्वये 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व रु.5000/- दंड, दंड न भरल्यास 5 महिने सक्त मजुरी शिक्षा ठोठावली आहे.
घटना घडल्यापासून या खटल्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आज सुनावणी झाल्याप्रमाणे जी शिक्षा झाली ती अहमदनगर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आहे, अशी लोकभावना आहे.









