नगर - जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलांनी स्वतःतील गुणांचा शोध घेऊन त्याचा विकास केला पाहिजे. यशासाठीचे योग्य नियोजन ध्येय प्राप्तीसाठी आ...

नगर - जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलांनी स्वतःतील गुणांचा शोध घेऊन त्याचा विकास केला पाहिजे. यशासाठीचे योग्य नियोजन ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असते. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन आपले कला-कौशल्य वृध्दींगत करावे. यासाठी नवीपेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळ हे एक चांगले व्यासपीठ आहे. दरवर्षी अशाप्रकारे स्पर्धा घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून समाज समाज कार्याबरोबरच नवी पिढी सुसंस्कृत घडविण्याचे कार्य मंडळाच्यावतीने होत आहे. असे प्रतिपादन शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या श्रीमती आशाताई फिरोदिया यांनी केले. श्री जय आनंद महावीर युवक मंडळाने आयोजित केलेल्या स्व.शांतीभाऊ फिरोदिया स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.संग्राम जगताप, मंडळाचे अध्यक्ष व नगर अर्बनचे व्हा.चेअरमन शैलेश मुनोत, परिक्षक चंद्रकांत अली, रमाकांत बर्डे, किशोर दळवी, सेक्रेटरी सत्येन मुथा, महिला अध्यक्षा सौ.राखी मुनोत, प्रा.एन.बी.मिसाळ आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान उपकरण शिक्षक गटात पारितोषिक मिळविल्याबद्दल किशोर दळवी सर यांचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमध्ये इ. 1 ली ते 6 वी मधील 840 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थी व पालकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल शैलेश मुनोत यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी फिरोदिया कुटुंबियांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.









