नगर - अहमदनर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असो.च्या मान्यतेने व अकोले तालुका बॉडी बिल्डर्स असो.च्या सहकार्याने धर्मवीर शंभुराजे हिंदू मित्र ...
नगर - अहमदनर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असो.च्या मान्यतेने व अकोले तालुका बॉडी बिल्डर्स असो.च्या सहकार्याने धर्मवीर शंभुराजे हिंदू मित्र मंडळ व अगस्ती जिमन्याशियम अध्यक्ष मुस्ताक पटेल यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी भव्य बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेतून अगस्ती तालुका श्री, मास्टर श्री ज्युनिअर (40 वर्षावरील) व सिनिअर (50 वर्षावरील), खुल्यागटात अकोले श्री, बेस्ट पोझर व मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर्स निवडण्यात येणार आहे. खुल्या वर्गात 6 गटांत ही स्पर्धा होणार असून, प्रत्येक गटात पहिल्या 5 क्रमांकात 500, 400, 200, 150 रु. रोख आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धकांची एकवेळच्या जेवणाची व प्रवास भत्याची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकरराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष महेशदादा सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमभाऊ भोगाडे, कार्याध्यक्ष डॉ.अविनाश मोरे यांनी केले आहे.










