नगर - शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराचे गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मंदिराच्या गर्भग...
नगर - शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराचे गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मंदिराच्या गर्भगृहाचे काम सुरु आहे, यासाठी अनेक मदत देत आहेत. कुऱ्हे परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीबद्दल धन्यवाद देऊन दानशुरांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरातील गाभाऱ्याच्या जिर्णोध्दारासाठी सोमनाथ कुऱ्हे यांनी 51 हजार रुपयांची देणगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी उपाध्यक्ष पंडित खरपुडे, विश्वस्त गजानन ससाणे आदि उपस्थित होते.
पुढे बालतांना अॅड. आगरकर म्हणाले, मंदिराच्या गर्भगृहाचे काम हे युध्दपातळीवर सुरु असून पुढील काही महिन्यातच अतिभव्य, उत्कृष्ट, कोरीव असे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









