नगर शहरातील सेक्रेड हार्ट कोन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षक वेतन निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडे रु. 1000/- शुल्क वसूल करण्यात येते की, ही ...

नगर शहरातील सेक्रेड हार्ट कोन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षक वेतन निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडे रु. 1000/- शुल्क वसूल करण्यात येते की, ही माहिती कळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मनमानी कारभाराला विरोध दर्शविला होता. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दिली होती व पाठपुरावा केला होता. चौकशीअंती शिक्षणाधिकाऱ्यांनीही त्यात तथ्य आढळून आल्याचे मान्य केले आहे. त्यांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आदेश दिले आहेत की, भविष्यात जर कोणी फी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून विविध कारणासाठी पैसे घेतले तर त्या संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्यात
येईल, असे लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप-जिल्हाध्यक्ष अभिषेक मोरे यांना दिले आहे.









