नगर - कै.डॉ.ना.ज.पाऊलबुध्दे यांनी ज्या हेतून शिक्षण संस्था उभारली तो हेतू सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने सार्थ केला 28 वर्षापूर्वी 1 ख...
नगर - कै.डॉ.ना.ज.पाऊलबुध्दे यांनी ज्या हेतून शिक्षण संस्था उभारली तो हेतू सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने सार्थ केला 28 वर्षापूर्वी 1 खोलीत 4 विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आज 4 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन स्वतःचे नावलौकिकासह शाळेचेही नाव उंचावत राज्यस्तरावर संस्थेचे गुणवत्तेचे प्रतिक दाखवून दिले, असे गौरवोद्गार संस्थेचे खजिनदार रामभाऊ बुचकुल यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाऊलबुध्दे बी.एड.व डी.टी.एड.कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. बुचकुल बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बाळ बोठे, देवदत्त पाऊलबुध्दे, दादासाहेब भोईटे, प्राचार्या रेखाराणी खुराणा, मुख्याध्यापक कल्पना लवांदे, अनिता सिद्दम, रोहिणी संभार, सविता सापा आदि उपस्थित होते.









