राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी सायन्स अॅकॅडमी तर्फे विज्ञान जत्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि. 28 फेब्रुवारी 2016 रोजी ...
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी सायन्स अॅकॅडमी तर्फे विज्ञान जत्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि. 28 फेब्रुवारी 2016 रोजी सायं.6.00 वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रोफेसर कॉलनी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे होणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी रोबोटीक्स, सौरऊर्जा, चुंबकीय प्रेशर, सौरमंडळ, मंगलयान, तसेच रासायनिक व जीवशास्त्रांवर आधारित प्रयोग व उपकरणे सादर करतील. प्रदर्शनात विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांमधील भेसळ ओळखणारे प्रय़ोग सुध्दा करुन दाखविण्यात येतील. प्रदर्शनाचे उद्घाटन नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनास हृदयरोगतज्ञ डॉ.संदिप गाडे, तारांगणचे संचालक प्रा.अशोक जोगदे उपस्थित राहणार आहेत. मॅजिक हार्ट व प्राचीन काळी अचूक वेळ सांगणाऱ्या सन डायलस या विषयावर व्याख्यान ऐकावयास मिळणार आहे.
प्रदर्शनात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणवंतांना पारितोषिके देण्यात येणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणवंतांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनात भाग घेण्याची इच्छा आहे, त्यांनी सिनर्जी सायन्स अॅकॅडमीशी संपर्क साधावा. संपर्कासाठी मो.नं.9970970888. पालकांसाठी आपल्या पाल्यासह प्रदर्शन पाहण्याचे आवाहन सिनर्जी सायन्स अॅकॅडमीचे संचालक डॉ.दत्ता पोंदे यांनी केले आहे.










