राज्य सरकारचा शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न-शिक्षक आमदार कपिल पाटील नगर- शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी त्यांचे शोषण क...
राज्य सरकारचा शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न-शिक्षक आमदार कपिल पाटील
नगर- शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी त्यांचे शोषण करुन शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार कडून सुरु आहे. त्यामुळे शिक्षक व तरुणांनी संघटीत राहुन मुकाबला करणे गरजे आहे. घटनेने शिक्षकांना मोठा अधिकार दिला असून त्याचा वापर करण्यास शिका, असे आवाहन शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी केले आहे.
शिक्षक भारती संघटनेचा जिल्हा मेळवा रविवारी सरस्वती लॉन येथे झाला. यावेळी आमदार कपिल पाटील बोलत होते शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनिल गाडगे, अध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, नवनाथ गेंड, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, जिल्हा महिला अध्यक्षा अशा मगर, सचिव विभावरी रोकडे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, संध्या गावडे, शोभना गायकवाड, मोहम्मद समी शेख, जॉन सोनवणे, जान्हवी नरसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.