अ.नगर - दि.10-2-2016 शालेय राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टेनिस स्पर्धा दिल्ली या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जनता माध्य. व उच...
अ.नगर - दि.10-2-2016 शालेय राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टेनिस स्पर्धा दिल्ली या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जनता माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाच्या गोरे शुभम राजकुमार या खेळाडूने सुवर्णपदक पटकाविले.
17 वर्षे वयोगटात महाराष्ट्र आणि हरियाणा या संघामध्ये अंतिम लढत होऊन महाराष्ट्र संघाने तीनपैकी दोन्ही सेट 15/13 तसेच 15/12 अशा गुणांनी जिंकून, एक सेट राखून विजय संपादन केला.
या खेळाडूस विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री दत्तापाटील नारळे, कैलास कोरके, श्री.टी.एम.मुळे. भाऊसाहेब पवार आदींनी मार्गदर्शक केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष श्री.माधवरावजी मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सेक्रेटरी श्री.जी.डी. खानदेशे, सहसेक्रेटरी सौ.दिपलक्ष्मी म्हसे, जेष्ठ विश्वस्त रामनाथजी कर्पे, पर्यवेक्षक आऱ.आऱ.गोरे, रमेश भांबरे, बाळासाहेब दरंदले, प्रभाकर भांबरे आदिंनी अभिनंदन केले.










