श्रीगोंदा - मांडवगण येथील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव लोखंडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल पद्मश्री डॉ.मनीभाई प्...

श्रीगोंदा - मांडवगण येथील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव लोखंडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल पद्मश्री डॉ.मनीभाई प्रतिष्ठाण उरुळी कांचन जि.पुणे यांच्या वतीने राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाला. निवडीचे पत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे यांनी दिले. मान्यवरांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण पुणे येथे होत आहे.
माणिकराव लोखंडे हे विद्यमान ग्रा.प.सदस्य असून ज्येष्ठ नागरिक संघाचे व भैरवनाथ प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आहेत अपंग व वृध्दाचे कल्याणासाठी अहोरात्र कार्य़ करतात त्याना यापुर्वीही विविध संस्था मार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार मिळालेले आहे. दैनिक पत्रकार म्हणून काम पाहतात.









