नगर - सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व साईनाथ बहुउद्देशिय क्रिडा संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेची निवड चा...
नगर - सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व साईनाथ बहुउद्देशिय क्रिडा संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेची निवड चाचणी, नगर येथे अरणगांव बायपास रोडवर झाली. केरळ येथे दि.24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व वयोगटातील महाराष्ट्राच्या टीमची निवड चाचणी घेण्यात आली. ओम उद्योग समुहाचे संचालक उद्योगपती बाळासाहेब पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून व वारळ वाढवून निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात झाली. यावेळी साईनाथ बहुउद्देशीय क्रिडा संस्थेचे अध्यक्ष व स्पर्धा संयोजक प्रा.संजय साठे, सायकलिंग फेडरेशन इंडियाचे सचिव प्रसाद जाधव, प्रमुख पंच नरेंद्र सिंग, धर्मेंद्र लांबा, शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या दिपाली पाटील, निता रजपूत, प्रा.धनंजय वानखेडे आदिंसह राज्यातून 24 जिल्ह्यामधून 230 हून अधिक स्पर्धक आपआपल्या अत्याधुनिक सायकलिंसह सहभागी झाले होते.
उद्घाटनप्रसंगी बोलतांना बाळासाहेब पवार म्हणाले, यजमान म्हणून नगरमध्ये सर्व स्पर्धकांची चांगली व्यवस्था होत आहे. नगरमध्येही सायकलिंगसाठी या स्पर्धांमुळे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. अनेक चांगले सायकलपटू नगरमधून तयार झाले आहेत. प्रा.संजय साठे व त्यांची सर्व टीम या निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता चांगली मेहनत घेत आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे - 18 वर्षाखालील (मुले) जाधव मिहिर (ठाणे), मच्छिंद्र पवार (सांगली), अश्विन पाटील (बांद्र), प्रतिक पाटील (कोल्हापूर). मुली : वायकर मधुरा (मुंबई), वैष्णवी गव्हाणे (बांद्रा), प्रियंका करांडे (सांगली), विश्वधारा शेरकर (पुणे), 23 वर्षाखालील (मुले), किशोऱ जाधव (पुणे विद्यापीठ), विनीत जाधव (पुणे विद्यापीठ), विनीत सावंत (मुंबई), प्रणव अंभुरे (पुणे), वैभव भोर (पुणे विद्यापीठ), (मुली) : प्रिताली शिंदी (रायगड), कोमल देशमुख (पुणे), श्वेता पुंढावणे. 16 वर्षाखालील (मुले) : अभिषेक काशिद (पुणे विद्यापीठ), शुभम भोसले (पुणे विद्यापीठ), मानसी कळमकर (कोल्हापूर), प्रियंका जाधव (पुणे विद्यापीठ), श्रीनिवास लोंढा (नगर), कृष्णा हराळ (नगर). मुली : अक्षता डोंगरे (पुणे), सोनाली अग्रे (कोल्हापूर), प्रियंका जाधव (पुणे विद्यापीठ), मानसी कळमकर (कोल्हापूर). खुला गट : दिलीप माने (सांगली), किरण अंत्रम (अमरावती), ओेकार जाधव (मुंबई), शहिद अहमद जमादार (सांगली), हुसेन कुरम (सांगली)










