राहुरी - वांबोरी येथील अ.ए.सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी व शाळेचे संस्थापक कै.बाबुशेठ...
राहुरी - वांबोरी येथील अ.ए.सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी व शाळेचे संस्थापक कै.बाबुशेठ मुथा यांची 48 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रसिध्द शिवशाहीर विजय तनपुरे यांचा शिवचरित्रावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. अशोक नागदे यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्य़क्रमाचे महत्व सांगितले. मान्यवरांच्या हस्ते कै.बाबुशेठ मुथा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शामराव पटारे यांनी कै.बाबुशेठ मुथा यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देताना म्हटले की कै.बाबुशेठ मुता यांनी वर्षाच्या 22 व्या वर्षी सत्याग्रहात सहभाग घेतला. स्वातंत्र मिणळ्यासाठी अनेक धावपळीत भाग घेतला त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी वांबोरी येथे हायस्कूल स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. वांबोरी गावाचे सरपंच असतांना त्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक विधायक कार्य केले.










