नगर - टिळक रोड यंग पार्टीच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित घटकांना मदत केली जाते. जुन्या मनपा कार्यालयासमोरी...

नगर - टिळक रोड यंग पार्टीच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित घटकांना मदत केली जाते. जुन्या मनपा कार्यालयासमोरील यतीमखाना येथील मुलांना टिळक रोड यंग पार्टीच्या वतीने उद्योजक राजू एकाडे यांच्या हस्ते फळ, आईस्क्रिम व केकचे वाटप करण्यात आले.
यावेळी संभाजी पवार, अन्वर कादरी, अनिस शेख, नितीन कटारिया, अजय डहाळे, संघर्ष सर, हमीद सय्यद, अय्यूब खान, निसारअली सय्यद, ज्ञानेश्वर लबडे, इम्रान शेख आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राजू एकाडे म्हणाले की, समाजाचे आपण काही देणे लागतो, या जाणिवेतून टिळक रोड यंग पार्टी समाजकार्य करीत आहे. वेळोवेळी गोरगरीबांना मदत करण्याचे काम ही पार्टी करते. सण, उत्सवानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याचा त्यांचा प्रय़त्न इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे, असे ते म्हणाले.









