नगर - गजल, गीत व मुशायऱ्याला दिवसेंदिवस रसिकवर्ग वाढत चालला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे उर्दू भाषा. या भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शि...
नगर - गजल, गीत व मुशायऱ्याला दिवसेंदिवस रसिकवर्ग वाढत चालला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे उर्दू भाषा. या भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक गनीमोहंनद यांनी केले.
एमआयडीसी येथील डॉ.राधाकृष्णन उर्दू शाळेत मिर्झा गालीब यांच्या स्मृतीदिन हा उर्दू दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गनी मोहम्मद बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवियित्री डॉ. कमर सुरुर, इंजि.अनिस शेख, जनशिक्षण संस्थेचे शफाफत सय्यद, उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान, शेख आफाक, अलहाज के.एम.पठाण आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बाल साहित्याची पुस्तके वाटप करण्यात आली.
गनी मोहंमद पुढे म्हणाले, शायरी (कविता) ची नजाकत व त्यांच्या गोडव्यामुळे आज गाजलेंला चांगले दिवस आले आहेत. भविष्यात लक्ष केंद्रीत करणे गरजेचे झाले आहे. नाही तर भविष्यात उर्दू शाळांची संख्या फार कमी राहिलेली दिसेल, अशी खंत व्यक्त केली.










